आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

शनिवारी राहावे सावध, वादामध्ये अडकू शकता, वाचा राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चंद्र दिवसभर ज्येष्ठा नक्षत्रामध्ये असल्यामुळे मुसळ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने आज काही लोक व्यर्थ वादामध्ये अडकू शकतात. काही लोकांना धनहानी होऊ शकते. आज चंद्र आणि शनि एकाच राशीत असल्यामुळे विष योग तयार होत आहे. या योगामुळे चुकीचे निर्णय घेतेले जाऊ शकतात. या योगाच्या प्रभावाने मानसिक तणाव वाढू शकतो. हे दोन्ही योग दिवसभर सर्व राशींना प्रभावित करतील. यामुळे आज सर्वांनी सावध राहावे.

या दोन अशुभ योगांच्या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून आलेला आहे. हा शुभ योग धनलाभ आणि आनंदी वार्ता देऊ शकतो. अशुभ योग व्यतिरिक्त आज या शुभ योगाचाही प्रभाव सर्व राशींवर राहील. जाणून घ्या, कोणत्या राशीतील कोणता ग्रह तुमच्यावर कसा प्रभाव टाकत आहे.

आजची ग्रहस्थिती -
सूर्य - मकर राशीमध्ये
चंद्र - वृश्चिक राशीमध्ये
मंगळ - कुंभ राशीमध्ये
बुध - मकर राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - मकर राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजच्या योगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...