आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Hindu Wedding Ceremony At Its Core Is Essentially A Vedic Yajna Ritual

देवता जागे झाले, लग्नासाठी 7 महिन्यात केवळ 26 मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देव प्रबोधिनी एकादशीपासून देवता झोपेतून जागे होताच लग्न समारंभाचा काळ सुरु होतो. देव प्रबोधिनी एकादशीला शुभ मुहूर्तावर लग्नाची सनई वाजल्यानंतर आता 26 नोव्हेंबरपासून लग्न मुहूर्त चालू होत असून विभिन्न तारखांना 13 जुलैपर्यंत राहतील. यावर्षी देव झोपेतून उठण्यापासून झोपण्यापर्यंत सात महिन्यांच्या काळात लग्नासाठी केवळ 26 मुहूर्त आहेत. या वर्षी जुलै महिन्यात लग्नासाठी सर्वात कमी म्हणजे 1 मुहूर्त आणि एप्रिल महिन्यात सर्वात जास्त 10 मुहूर्त आहेत.

7 महिन्यात 26 मुहूर्तच का?
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांच्यानुसार, लग्नाच्या मुहूर्तासाठी ज्योतिषी सर्वात पहिले लता, पात, युती, यामित्र, वेध, पंचक, एकर्गल, उपग्रह, क्रांती साम्य आणि दग्धा तिथी हे दहा प्रकारचे दोष पाहतात. त्यानणार लग्नासाठी दोष रहित तारीख काढली जाते. नोव्हेंबर ते जुलैपर्यंतच्या सात महिन्याच्या काळात या 26 मुहूर्ताच्या जवळपास सर्व तारखा दोष रहित असून अक्षय पुण्य्कारी आहेत. यामुळे लाग्नासती 26 श्रेष्ठ मुहूर्त आहेत. इतर तारखांना कोणता न कोणता दोष असल्यामुळे लग्नासाठी सबंधित कुटुंबांनी दोष निवारण करण्यासाठी पुरोहिताच्या सल्ल्याने पूजा-अनुष्ठान करणे आवश्यक आहे.

131 दिवस लग्न करण्यात अडचण
1. 16 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत धनु संक्रांती मलमास (31 दिवस)
2. 14 मार्चपासून 13 एप्रिलपर्यंत मीन संक्रांती मलमास (31 दिवस)
3. 3 मे पासून 10 जुलैपर्यंत शुक्र अस्त (69 दिवस)

लग्नाचे शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...