ज्या लोकांच्या जन्म नावाचे पहिले अक्षर तो, ला, नी, नू, ने, नो, या, यी, यू या अक्षरापासून सुरु होते त्यांची रास वृश्चिक असते. वृश्चिक राशीचे लोक आदर्श प्रेमी असतात.
आपल्या प्रेमासाठी हे काहीही करू शकतात.हे लोक जिद्दी स्वभावाचे असतात. आकर्षक व्यक्तिमत्वामुळे इतरांना प्रभावित करण्याची योग्यता ठेवतात. आत्मविश्वासामुळे यांना विविध कामामध्ये यश मिळते.
वृश्चिक राशीचा परिचय
या राशीचे चिन्ह विंचू असून ही उत्तर दिशेची प्रतिक रास आहे. ही रास जलतत्त्वाची आहे. स्वामी मंगळ असून ही स्थिर रास आहे. या राशीचे व्यक्ती सुंदर शरीरयष्टीचे असतात. कुंडलीत मंगळ ग्रहाच्या कमजोर स्थितीमुळे रक्त संबंधित रोग होण्याची शक्यता राहते. कुंडलीत चंद्र कमजोर असले तर हे लोक अॅलर्जीनेही पिडीत राहू शकतात. हे लोकांमध्ये शारीरिक आणि मानसिक शक्ती भरपूर प्रमाणात असते.
पुढे जाणून घ्या, वृश्चिक राशीसंदर्भात इतर काही खास गोष्टी....