आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला कशी करावी श्रीकृष्णाची पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार श्रीकृष्णाची कृपा प्राप्त झाल्यास घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास राहतो तसेच जीवनातील सर्व समस्या नष्ट होतात. चांगला काळ सुरु होतो. हिंदू धर्म ग्रंथानुसार श्रावण मासातील कृष्णपक्ष अष्टमीला कंस रक्षाचा वध आणि धर्माच्या रक्षणासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला. यावर्षी 17 ऑगस्ट, रविवारी जन्माष्टमी आहे. या दिवशी श्रीकृष्णाची विशेष पूजा-अर्चना केली जाते. येथे
राशीनुसार भगवान श्रीकृष्णाची कशी पूजा करावी हे सांगण्यात येत आहे..

मेष - या राशीच्या लोकांनी गंगेच्या पाण्याने राधा-कृष्णाला अभिषेक करावा. दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ नमो भगवते वासुदेवाय नम: या मंत्राचा जप करावा.
वृषभ - पंचामृताने श्रीकृष्णाला अभिषेक करावा. लाडूचा नैवेद्य दाखवावा. श्रीराधाकृष्ण शरणम् मम या मंत्राचा जप करावा.
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)