आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • January 23, Subhash Chandra Bose Birthday And Kundali

सुभाषचंद्र बोस यांच्या कुंडलीतील योग आणि त्यांचे काही खास विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1987 मध्ये ओडिशा राज्यातील कटक येथे झाला होता. यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. मान्यतेनुसार 18 ऑगस्ट 1945 मध्ये विमान दुर्घटनेत यांचा मृत्यू झाला. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सुभाषचंद्र बोस यांची रास कन्या होती. यांच्या जन्माच्या वेळी सूर्य, बुध आणि राहू मकर राशीत, शुक्र कुंभ राशीत स्थित होते. गुरु सिंह राशीत आणि मंगळाची गुरुवार चतुर्थ पूर्ण दृष्टी होती.

गुरूच्या महादशेचा प्रभाव
सुभाषचंद्र बोस यांच्या कुंडलीत गुरु ग्रह सूर्याची रास सिंहमध्ये स्थित होता. 1928 ते 1944 या काळात गुरूची महादशा चालू होती. हा तोच काळ होता, जेव्हा त्यांनी स्वतःला देश सेवेसाठी पूर्णपणे समर्पित केले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आंदोलन उभारले. गुरूच्या महादशा काळात त्यांना सर्वांचे समर्थन मिळाले. भारतासोबतच परदेशातही त्यांना राजकारण आणि इतर क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा मिळाली.

या कारणामुळे वाढले विरोधी
कुंडलीत गुरु वक्री असल्यामुळे यांचे विरोधकही खूप होते. विरोधकांनी त्यांचे यश लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. गुरु ग्रहावर शुक्राची दृष्टी असल्यामुळे ते असामान्य काम करणारे व्यक्ती बनले. 1944 नंतर शनीची महादशा सुरु झाली होती. शनि शत्रू मंगळाची रास वृश्चिकमध्ये होता आणि त्यावर मंगळाची क्रूर दृष्टीसुद्धा होती. तसेच शनि आठवा असल्यामुळे त्यांना लोखंड धातूपासून धोका होता. हे खरेसुद्धा ठरले, 1945 मध्ये एका विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सुभाषचंद्र बोस यांचे काही विचार...