आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाच्या 10 दिवस शनि-गुरु राहणार उच्चेचे, असा राहणार तुमच्या राशीवर प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून दहा दिवसाचा गणेशोत्सव प्रारंभ होईल. या वर्षी गणेश चतुर्थीला शनि आणि गुरु दोन्ही ग्रह आपापल्या उच्च राशीमध्ये स्थित आहेत. असा योग 58 वर्षांपूर्वी सन् 1955 मध्ये जुळून आला होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी गणेश चतुर्थीला आणखी एक योग जुळून येत आहे. सूर्य आपल्या स्वतःच्या सिंह राशीत स्थित राहील. बुध ग्रहसुद्धा काही दिवसानंतर आपल्या उच्च कन्या राशीत जाईल. असा योग खूप वर्षांमध्ये एकदाच जुळून येतो.

पं. शर्मा यांच्यानुसार पुढील काळात 59 वर्षांनंतर सन् 2073 मध्ये असा योग पुन्हा जुळून येईल. त्या वेळीसुद्धा गुरु आणि शनि आपापल्या उच्च राशी कर्क व तूळमध्ये राहतील. बुध ग्रहसुद्धा उच्चेचा राहील. श्रीगणेशाचे विसर्जन 8 सप्टेंबर 2014 रोजी केले जाईल. हा काळ ग्रहस्थितीमुळे आणखी अद्भुत राहील. या दिवशी गुरु कर्क राशीत, शनि तूळमध्ये आणि बुध कन्या राशीत राहील. राहू आणि केतू मित्र राशीमध्ये राहतील. नऊमधील सात ग्रह अनुकूल स्थितीमध्ये राहतील. हा एक दुर्लभ योग आहे. 1955 मध्ये असा योग जुळून आला नव्हता आणि 2073 मध्येही असा योग जुळून येणार नाही. केवळ 2014 मध्ये हा अद्भुत योग जुळून येत आहे.

पुढे जाणून घ्या, या दुर्लभ योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....