आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाक्षरीवरून ओखळता येतो व्यक्तीचा स्वभाव; जाणून घ्या चमत्कारीक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वभावाला औषध नाही असे म्हटले जाते. परंतु व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. हे त्याच्या स्वाक्षरीवरूनही ओळखता येते. व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेताना अनेक बाबींचे अध्ययन केले जात असते. स्वाक्षरी अर्थात सिग्नेचरवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखणे आता सहज शक्य झाले आहे.
अनेकांना आपल्या स्वाक्षरीबाबत अप्रुप असते. काही तर सारखे आपल्या स्वाक्षरीचा सराव करताना दिसतात. कागद दिसला म्हणजे त्यावर विनाकारण आपली स्वाक्षरी गिरवत असतात. अशा व्यक्ती आत्मकेंद्री असतात. ते केवळ स्वत:चाच विचार करतात. दुसर्‍यांच्या भावनाशी त्यांना काही एक घेेणे देणे नसते. अशा व्यक्ती अहंकारी असतात. मीच सर्वज्ञ आहे. बाकीच्यांना तर काही येत नाही, अशीच त्यांची धारणा असते.

काही व्यक्तींची स्वाक्षरी अतिशय छोटी असते. अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो. आपल्या स्वाक्षरीत झाड, फुले, हसरा चेहरा काढणारी व्यक्ती दुसर्‍यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असते. तर आपल्या स्वाक्षरीत गोलाकार काढणारी व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात. काही प्रसंगी त्यांच्यात अतिउत्साहही त्यातून प्रदर्शित होत असतो.

काही व्यक्तीतर आपल्या नावापेक्षा आडनावच अधिक गडद करण्याचा प्रयत्न करतात. अशी व्यक्ती आपल्या कुळाला प्राधान्य देणारी असते. आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो, हे त्यातून त्याला दाखवून द्यायचे असते. काही व्यक्ती आपल्या स्वाक्षरीमध्ये इंग्रजी अथवा अन्य भाषांचा वापर करतात. अशा व्यक्तीचे ध्येय अनिश्चित असते. त्यांना कोणत्याही गोष्टीचे नियोजन करायला आवडत नाही. त्यांच्या या स्वभावाचा त्यांच्या करिअरवर विपरीत परिणाम होत असतो.
काही व्यक्ती स्वाक्षरी करताना तुटक-तुटक अक्षरे काढतात. अशा व्यक्तींना एकाकी राहणे पसंत असते. त्यांना कोणाशीही काही घेणे-देणे नाही. आपण भले आणि आपलं जग भलं, असा त्यांचा स्वभाव असतो. काही जण आपल्या स्वाक्षरीखाली रेषा ओढतात. स्वाक्षरीखाली सरळ रेषा ओढणारे व्यक्ती परखड मतांचे असतात. वक्र आणि तिरकस रेषा ओढणारे व्यक्ती मुडी असतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, स्वाक्षरी आणि व्यक्तीच्या स्वभावाबाबतच्या महत्त्वपूर्ण गोष्टी तसेच वाचा स्वाक्षरीबाबत चमत्कारीक उपाय...

(फोटो: वरील छायाचित्र साधरीकरणासाठी वापरण्यात आले आहे.)