आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 वर्ष जुने आहे हे मंदिर, येथे पूर्ण होतात धन-संपत्तीच्या सर्व इच्छा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्री सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती )

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर सर्व भक्तांचे मुख्य आस्था केंद्र आहे. येथे येणारा भक्त गरीब असो वा श्रीमंत तो दर्शनाला भक्तिभावाने येतो. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. या प्राचीन मंदिराची स्थापना 19 नोव्हेबर 1801 रोजी करण्यात आलेली आहे.

या मंदिराचा गाभारा प्राचीन शैलीत तयार करण्यात आला आहे. त्यावर एक विट आणि त्यावर एक कलश ठेवलेला आहे. हे मंदिर प्रभादेवीतील काकासाहेब गाडगीळ मार्गावर आणि एस.के बोले मार्गाच्या कोप-यात वसलेले आहे.

अशी आहे सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती -

असे मानण्यात येते की, श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा काळ्या पाषाणात तयार करण्यात आलेली आहे. मूर्तीची उंची साधारण 750 मिमी आणि लांबी 600 मिमी आहे. या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे. ज्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला असते त्या गणपतीला महागणपती असे मानले जाते. मूर्तीच्या वरील उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात परशु स्थित आहे. खालच्या डाव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात मोदक पात्र आहे.

मूर्तीच्या कपाळावर एक नेत्र आहे जे शंकराच्या त्रिनेत्राप्रमाणे दिसते. गणपतीच्या दोन्ही बाजूला ऋद्धी आणि सिद्धी आहेत. गणपतीसोबत असलेल्या दोन देवींच्या मूर्तीमुळे या मंदिराचे नाव सिद्धिविनायक गणपती मंदिर असे ठेवण्यात आले. ऋद्धीआणि सिद्धी, या दोघी गणपतीच्या पत्नी आहेत. गणपतीच्या आराधनेसोबत या दोघींची आराधना केल्यास यश, धन आणि समृद्धि प्राप्त होण्यास मदत होते.

पुढील स्लाइडवर पाहा सिद्धिविनाय मंदिराचे काही फोटो...