आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Vikram Samvat 2071 Starts From 31, Rise In Terrorist Activities!

31 मार्चला सुरू होणारे \'विक्रम संवत् 2071\' ठरू शकते घातक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार, यंदाचे 'विक्रम संवत् 2071' हे 31 मार्चला सुरू होत आहे. या वर्षी सोम युगातील प्लवंग नावाचे संवत्‍सर राहणार आहे. या संवत्‍सराचा स्‍वामी बुध ग्रह तर राजा चंद्र आहे. यावेळीच्‍या संवत्‍सरामध्‍ये दुर्गेश हे पद सूर्याकडे असल्‍यामुळे हे वर्षे कसे असेल या विषयी ज्‍योतिष तज्‍ज्ञांनी सांगितलेली माहिती आम्‍ही आपल्‍याला देत आहोत. या संवत्‍सरामध्‍ये काय परिणाम होतो याची माहिती या श्लोकामध्‍ये देण्‍यात आली आहे.
तुष धान्यानि नश्यंति मेघों वर्षाति माधवे।
प्लवंगे पीडि़ता: सर्वे भूमिकम्पों भवेत्कवचित।।
काय परिणाम होतो 'विक्रम संवत् 2071'
प्लवंग संवत् मध्‍ये पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वैशाख(एप्रील- मे) महिन्‍यात पाऊस पडतो. यामुळे हातात आलेली पीक वाया जाते. काही ठिकाणी भूकंप होतो. या काळात पावसाचे प्रमाण्‍ा कमी होते. चोरांपासून सर्वसामान्‍य लोकांना त्रास सुरू होतो. वादळ-अवकाळी पाऊस यामुळे जन‍-जीवन विस्‍कळीत होते. नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढते.