दिवाळीपूर्वी येणारे पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी 16 ऑक्टोबरला हा गुरुपुष्य योग जुळून येत आहे. याला खरेदीचा महामुहुर्त असेही म्हणतात. 16 ऑक्टोबरला गुरुपुष्यसोबत अमृतसिद्धी, सर्वार्थसिद्धी व गजकेसरी योग जुळून येत आहेत. आज आम्ही तुम्हाला पुष्य नक्षत्राशी संबंधित खास गोष्टी सांगत आहोत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात. येथे जाणून घ्या, पुष्य नक्षत्राशी संबंधित 10 खास गोष्टी....
1- प्राचीन काळापासून ज्योतिष विद्वान 27 नक्षत्राच्या आधारावर गणना करत आले आहे. यामधील प्रत्येक नक्षत्राचा शुभ-अशुभ प्रभाव मनुष्यावर पडत असतो. नक्षत्राच्या या क्रमामध्ये आठव्या स्थानावर पुष्य नक्षत्र येते. ज्योतिष शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रामध्ये खरेदी करण्यात आलेल्या वस्तू प्रदीर्घ काळापर्यंत उपयोगात येतात तसेच शुभफळ प्रदान करतात, कारण हे स्थायी नक्षत्र आहे.
2- पुष्यला नक्षत्रांचा राजा मानले जाते. हे नक्षत्र आठवड्यातील विविध वारांसोबत मिळून विशेष योग तयार करते. या सर्व योगांचे एक विशेष महत्त्व आहे. रविवार, बुधवार आणि गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र अत्याधिक शुभ असते. ऋग्वेदामध्ये या नक्षत्राला मंगलकर्ता, वृद्धीकर्ता, आनंदकर्ता व शुभ सांगण्यात आले आहे.
पुष्य नक्षत्राशी संबंधित इतर खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)