आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Astrological Measure About New Dresses According Nakshtra

अशा प्रकारे नवीन ड्रेस परिधान केल्यास होऊ शकतो एखादा मोठा फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्त्र केवळ व्यक्तिमत्व, सौंदर्य खुलवतात असे नाही तर विशिष्ठ काळामध्ये परिधान करण्यात आलेल्या नवीन कपड्यांमुळे जीवनात विविध बदल घडू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार विशेष नक्षत्रामध्ये वस्त्र परिधान केल्यास त्याचा विशेष लाभ प्राप्त होतो. शास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्र सांगण्यात आले आहेत. यामधील काही नक्षत्र नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी शुभ तर काही अशुभ मानण्यात आले आहेत. नक्षत्रांची माहिती तुम्हाला कोणत्या पंचांगामध्ये सहजपणे मिळू शकते.

अश्विनी, रोहणी, पुनर्वसु, पुष्य, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, उत्तराषाढा, धनिष्ठा, उत्तराभाद्रपद, रेवती असे नक्षत्र आहेत ज्यामध्ये नवीन वस्त्र परिधान केल्यास शुभफळ प्राप्त होतात. यासोबतच काही नक्षत्र असे आहेत ज्यामध्ये नवीन वस्त्र परिधान केल्यास अशुभ फळ प्राप्त होतात. भरणी, कृतिका, मृगशिरा, आद्रा, मघा, पूर्वा फाल्गुनी, ज्येष्ठा, मूल, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिषा, पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये नवीन वस्त्र परिधान करू नयेत. येथे जाणून घ्या, कोणत्या नक्षत्रामध्ये नवीन कपडे परिधान केल्यास कोणते फळ प्राप्त होते.

अश्विनी - भरपूर वस्त्र लाभ होऊ शकतो
भरणी - वस्त्रांचा नाश होऊ शकतो.
कृतिका - वस्त्र जळण्याचा धोका राहतो
रोहणी - यश प्राप्त होऊ शकते.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कोणत्या नक्षत्रामध्ये नवीन वस्त्र परिधान केल्यास होऊ शकतो विशेष धनलाभ...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)