आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know By Birth Chart Your Prenatal Secrets, Who Were You In A Previous Life

PHOTOS : जाणून घ्या पूर्वजन्माचे रहस्य, कोण होतात तुम्ही मागील जन्मात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माची मान्यता आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार कोणत्याही जीवाचे केवळ शरीर नष्ट होते, आत्मा अमर आहे. आत्मा एक शरीर नष्ट झाल्यानंतर दुसर्या शरीरात प्रवेश करतो यालाच पुनर्जन्म म्हणतात. पुनर्जन्माच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात हे जाणून घेण्याची इच्छा असते की पूर्वजन्मात तो कोण होता तसेच वर्तमानात शरीराचा मृत्यू झाल्यानंतर या आत्म्याचे काय होणार?

भारतीय ज्योतिषशास्त्रात या विषयावर भरपूर अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीची कुंडली पाहून त्याच्या पूर्वजन्माविषयी आणि मृत्युनंतर आत्म्याच्या गतीबद्दल जाणून घेणे शक्य आहे. गीताप्रेस गोरखपूरने प्रकाशित केलेल्या परलोक आणि पुनर्जन्म पुस्तकात या विषयाचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे.

त्यानुसार जीव ज्यावेळी जन्म घेतो, ती वेळ, स्थान आणि तिथी पाहून त्याची जन्म कुंडली तयार केली जाते. त्यावेळेच्या ग्रहस्थितीनुसार केलेल्या अध्ययनावरून हे माहिती करून घेतले जाऊ शकते की, जन्मलेला जीन कोणत्या योनीतून आला आहे आणि मृत्युनंतर त्याची काय गती होईल. पुढे या संदर्भात काही विशेष योग सांगण्यात आले आहेत...

जन्मपूर्व योनी विचार
1- ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चार किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह उच्च राशीचे किंवा स्वराशीचे असतील तर त्या व्यक्तीने उत्तम योनी भोगून जन्म घेतला आहे, असे ज्योतिषीय मानतात.

2- लग्न कुंडलीत चंद्र उच्च राशीचा असेल तर तो व्यक्ती पूर्वजन्मात वणिक (समुद्र व्यापारी, आभूषण व्यापारी) होता, असे मानले जाते.