आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 मध्ये जुळून येणारे ज्योतिषचे हे 15 खास योग, शनि-गुरूचा राहणार प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्ष 2015 ला सुरुवात झाली असून या वर्षात ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून 15 खास योग जुळून येत आहेत. या वर्षी शनि आणि गुरूचा विशेष प्रभाव सर्व राशींवर राहील. तसेच सन-उत्सवांच्या दिवशीही विविध विशेष योग जुळून येतील. येथे जाणून घ्या, नवीन वर्षान कोणकोणत ज्योतिषीय योग जुळून येत आहेत.

१. गुरूचा प्रभाव राहणार - हे वर्षगुरुवारी सुरू होत असून गुरुवारीच संपणार आहे. या वर्षात जुलैच्या मध्यापर्यंत गुरू कर्क या उच्च राशीतच असेल. त्यानंतर सूर्य राशीमध्ये प्रवेश करेल. जवळपास १२ वर्षांनंतर गुरू सिंह राशीमध्ये जात आहे. गुरुची ही स्थिती देशासाठी खूप शुभ ठरेल.

२.शनी असेल वृश्चिकमध्ये - २०१५ यापूर्ण वर्षात शनी वृश्चिक राशीतच असेल. या राशीचा स्वामी मंगळ आहे. शनी आणि मंगळ यांच्यात शत्रुत्व असल्यामुळे वृश्चिक राशीतील व्यक्तींना थोडेसे सांभाळूनच राहावे लागेल. कर्कपासून शनी पाचवा असल्यामुळे तसेच शनीची नवम दृष्टी कर्कवर असल्यामुळे या स्थितीत शनीमुळे देशाचे नुकसान होणार नाही.

३.स्वातंत्र्यदिनी विशेष योग - यावर्षी स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्ट शनिवारी येत आहे. स्वतंत्र भारताचा उदय शनी हा स्वामी असणार्‍या पुष्य नक्षत्रात झाला होता. त्यामुळे शनिवारी येणारा स्वातंत्र्यदिन पूर्ण देशासाठी शुभ असेल.

पुढे जाणून घ्या, इतर कोणकोणते योग या वर्षात जुळून येत आहेत...