आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्रीला लक्षात ठेवा या गोष्टी; जाणून घ्या, 12 राशींचे खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार, 17 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून या दिवशी महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष पूजन केले जाते. महादेवाची कृपा प्राप्त झाल्यानंतर सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते. महादेवाची पूजा करणाऱ्या भक्तांनी येथे सांगण्यात आलेल्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

लक्षात ठेवा या गोष्टी...
महाशिवरात्रीला सूर्योदयापूर्वीची अंथरुणाचा त्याग करावा. सकाळी लवकर स्नान करून पवित्र वस्त्र धारण करा. एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच शिवलिंगाची पूजा करा. या दिवशी क्रोध आणि अधार्मिक कार्य करू नका. ज्या भक्तांना महाशिवरात्रीला व्रत करण्यासोबतच शिव पूजन करण्याची इच्छा असेल त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ऊँ नम: शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करा.

येथे जाणून घ्या, महाशिवरात्रीला राशीनुसार कोणकोणते उपाय केल्यास लाभ होऊ शकतो...
मेष - या राशीचा स्वामी मंगळ असून या ग्रहाचे पूजन शिवलिंग स्वरूपातच केले जाते. या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दुध,दही, धोतार्‍याचे फुल अर्पण करावे. कापूर लावून आरती करावी.

वृषभ - या राशीच्या लोकांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवशंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करावा. त्यानंतर मोगर्‍याचे अत्तर शिवलिंगावर अर्पण करावे. शेवटी मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करावी.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दहा राशींचे खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)