आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातून एकदा काळ्या तिळाचा असा उपयोग केल्यास प्राप्त होतील हे शुभफळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज स्नान करणे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच, परंतु त्याचबरोबर शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय केल्यास वाईट काळापासूनही मुक्ती मिळते. येथे जाणून घ्या असा एक उपाय, ज्यामुळे शनिदोष दूर होऊ शकतात.

पाण्यामध्ये काळे तीळ टाकून करावे स्नान...
शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शनिवार हा शनिच्या आराधनेचा मुख्य वार आहे. या दिवशी शनिची पूजाअर्चा केल्यास विशेष फायदा होतो. शनिवारी स्नानासंबंधी एक खास विधी सांगण्यात आलाआहे.

या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठा. नित्य कर्मे उरकल्यानंतर संपूर्ण शरीराला तेल लावून मालिश करा. यानंतर आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करा. स्नान केल्यानंतर तेलाचे दान करावे. मान्यतेनुसार या उपायाने शनिदोषातून मुक्ती मिळते. काळे तीळ आणि तेल या शनीच्या वस्तू मानण्यात आल्या आहेत.

पुढे जाणून घ्या, शनिदोष दूर करण्याचे इतर काही खास उपाय....