छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.
ज्या व्यक्ती महादेवाच्या भक्त आहेत त्यांच्यासाठी बिल्व पत्राशी निगडीत काही उपाय सांगण्यात येत आहेत. असे मानले जाते की, बिल्व पत्र महादेवाला अतिशय प्रिय आहे. शिवपुराणानुसार जो भक्त पूर्ण श्रद्धेने शिवलिंगावर बिल्व पत्र अर्पित करतो त्याच्या जीवनातील पैशासंबंधी अडचणी कायमच्या दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात. जाणून घ्या, बिल्व पत्राशी निगडीत काही गोष्टी आणि उपाय...
बिल्व पत्राशिवाय शिव-पूजा होत नाही पूर्ण
शास्त्रामध्ये महादेवाची पुजा करण्याचे अनेक प्रकारचे विधि सांगण्यात आले आहेत. यापैकी काही विधी करण्यास कठिण आहेत तर, काही अतिशय सोपे आहेत. जर एखादी व्यक्ती नियमितपणे शिवलिंगावर पाणी अर्पित करत असल्यास यामुळे देखील शिव कृपा प्राप्त होते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे की, शिवलिंगावर बिल्व पत्र अर्पित करावे. महादेवाच्या पुजेमध्ये बिल्व पत्राचे विशेष महत्व आहे. बिल्व पत्र अर्पण केल्याशिवाय महादेवाची पूजा पूर्ण होत नाही. अनेक वर्षांपासून अशी मान्यता आहे की, केवळ बिल्व पत्र वाहिल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच धनासंबंधी अडचणी दूर होण्यास मदत होते.
पुढे जाणून घ्या, बिल्व पत्राचे उपाय…