आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Astrological Reason About Sanjay Dutt's Will Have To Go Jail

संजू बाबा तुरुंगात जाण्यामागे हे ही एक मोठे कारण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुप्रीम कोर्टाने सुनावली आहे.संजयने यापूर्वी दीड वर्षे शिक्षा भोगल्यामुळे त्याला आता साडे तीन वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. कायदे तज्ञांच्या माहितीनुसार संजू बाबाची आता या शिक्षेपासून सुटका होणे शक्य नाही, तसेच ग्रह,ता-यांच्या संकेतानुसार संजू बाबाकडे तुरुंगात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

संजय दत्तच्या कुंडलीत शनी आणि राहूची अशी स्थिती आहे, जी त्याला तुरुंगाकडे नेणारी आहे. आतापर्यंत गुरूच्या महादशेमुळे संजू बाबा तुरुंगासाहित अन्य अडचणींपासून दूर होता, परंतु फेब्रुवारी २०१३ पासून शनीची महादशा सुरु झाली आणि त्याच्यामागे अडचणी सुरु झाल्या.