आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना कुटुंबीयांकडून पूर्ण मदत मिळत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, ज्या लोकांची कुंभ लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये बुध स्थित असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो.

कुंभ लग्न कुंडलीच्या तृतीय स्थानामध्ये बुध स्थित असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची कुंभ लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील तृतीय स्थानात बुध स्थित असेल तर व्यक्तीला भाऊ-बहिणीची पूर्ण मदत मिळत नाही. घरातील अडचणींमुळे हे लोक खूप दुःखी राहतात. कुंभ लग्न कुंडलीतील तृतीय स्थानात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. हे स्थान भाऊ-बहिण व पराक्रम कारक स्थान आहे. या स्थानात बुध असल्यास व्यक्तीच्या साहसामध्येही कमतरता येते. नशिबाची मदत मिळत नाही आणि याच कारणामुळे यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

कुंभ लग्न कुंडलीतील चतुर्थ स्थानामध्ये बुध स्थित असेल तर...
कुंभ लग्न कुंडलीतील चतुर्थ स्थान आई व घर-जमीन कारक स्थान असते. या स्थानामध्ये वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या स्थानामध्ये बुध असल्यास व्यक्तीला घर-जमिनीचे सुख मिळते. शिक्षण क्षेत्रामध्येही यांना यश मिळते. परंतु या स्थानात बुध असल्यास या लोकांना आईचे पूर्ण सुख मिळत नाही.