आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांच्या जीवनात बुध ग्रहामुळे निर्माण होतात अडचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीची कुंडली कुंभ लग्नाची असेल आणि कुंडलीत प्रथम आणि द्वितीय स्थानात बुध स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर बुधाचा प्रभाव कसा राहतो..

कुंभ लग्न कुंडलीत प्रथम स्थानात बुध असेल तर..
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली कुंभ लग्नाची असेल आणि कुंडलीत प्रथम स्थानात बुध स्थित असेल तर त्या व्यक्तीला शारीरिक स्वरुपात पूर्ण सौंदर्य प्राप्त होत नाही. या लोकांना आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते, नाही तर विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. कुंडलीतील प्रथम स्थान शरीर कारक स्थान असते आणि कुंभ लग्न कुंडलीत प्रथम स्थानात कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. शनीच्या या राशीमध्ये बुध असल्यास व्यक्तीला अनेकवेळा मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.
कुंभ लग्न कुंडलीत द्वितीय स्थानात बुध असेल तर..
कुंडलीतील द्वितीय स्थान धन आणि घर, कुटुंब कारक स्थान आहे. या स्थानावर बुध असल्यास व्यक्ती धन संचय करू शकत नाही. हे लोक खूप कष्ट करतात आणि पैसाही भरपूर कमावतात, परंतु पैसा जमा करू शकत नाहीत. कुंभ लग्न कुंडलीत द्वितीय स्थान मीन राशीचे असून स्वामी गुरु आहे. गुरूच्या या राशीत बुध असल्यास व्यक्तीला जीवनातील मुलभूत गरज भागवण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो.