आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना जीवनात प्राप्त होते धन आणि सौंदर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, कन्या लग्न कुंडलीतील तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये बुध स्थित असेल तर व्यक्तीचा जीवनावर कसा प्रभाव पडतो...

कन्या लग्न कुंडलीतील तृतीय स्थानात बुध असेल तर...
कुंडलीतील तृतीय स्थान भाऊ-बहिण व पराक्रम कारक स्थान असते. कन्या लग्न कुंडलीत या स्थानात वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाच्या या राशीत बुध असल्यास व्यक्तीला भाऊ-बहिणीकडून पूर्ण सुख आणि सहकार्य प्राप्त होते. या लोकांच्या धाडसामध्ये वृद्धी होते. हे लोक व्यवसाय करत असतील तर यांना चांगला लाभ प्राप्त होतो. हे लोक धार्मिक आणि समाजात मान-सन्मान प्राप्त करणारे असतात.

कन्या लग्न कुंडलीतील चतुर्थ स्थानात बुध असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची कन्या लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील चतुर्थ स्थानामध्ये बुध स्थित असेल तर या लोकांना आईचे पूर्ण सुख मिळते. कुंडलीतील चौथे स्थान आई व जमिनीशी संबंधित असते. कन्या लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात धनु राशीचा स्वामी गुरु आहे. गुरूच्या या राशीत बुध असल्यास व्यक्तीला घर, जमिनीचे पूर्ण सुख प्राप्त होते. या लोकांचा चेहरा सुंदर आणि स्वभाव शांत असतो.