आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे लोक दिसायला आकर्षक आणि प्रभावशाली असतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीची कुंडली वृश्चिक लग्नाची असेल आणि कुंडलीत प्रथम आणि द्वितीय स्थानात बुध स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर बुधाचा प्रभाव कसा राहतो.

वृश्चिक लग्न कुंडलीत प्रथम स्थानात बुध असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची वृश्चिक लग्न कुंडली असेल आणि त्यांच्या प्रथम स्थानात बुध स्थित असेल तर त्या व्यक्तीला सुंदर शरीर प्राप्त होते. हे लोक दिसायला आकर्षक आणि प्रभावशाली असतात. वृश्चिक लग्न कुंडलीत प्रथम स्थानात वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. कुंडलीतील प्रतम स्थान शरीर कारक स्थान आहे. या स्थानावर बुध असल्यास व्यक्तीला शारीरिक श्रम करून लाभ प्राप्त होतो. या लोकांना जोडीदाराकडून जीवनात काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक लग्न कुंडलीत द्वितीय स्थानात बुध असेल तर...
कुंडलीतील द्वितीय स्थान कुटुंब आणि धन कारक स्थान असते. या स्थानावर बुध असल्यास व्यक्तीला धन संचय करण्यात श्रेष्ठ शक्ती प्राप्त होते. वृश्चिक लग्न कुंडलीत द्वितीय स्थान धनु राशीचे असून स्वामी गुरु आहे. गुरूच्या या राशीमध्ये बुध असल्यास व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु या लोकांना जीवनात संपूर्ण सुख आणि ऐश्वर्य मिळते.