आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशा लोकांना मिळत नाही आईचे पूर्ण सुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि कुंडलीत तृतीय आणि चतुर्थ स्थानात केतू स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर केतूचा प्रभाव कसा राहतो..
सिंह लग्न कुंडलीत तृतीय स्थानात केतू असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लागांची असेल आणि तृतीय स्थानात केतू असेल तर त्या व्यक्तीला भावंडांकडून जास्त अडचणींना सामोरे जावे लागते. कुंडलीतील तृतीय स्थान भाऊ आणि पराक्रम करक स्थान आहे. सिंह लग्न कुंडलीत या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. शुक्राच्या या राशीत केतू असेल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. हे लोक पराक्रमी असतात आणि याच जोरावर ते यश प्राप्त करतात. हे लोक धाडसी, हुशार आणि कष्टाळू असतात.

सिंह लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात केतू असेल तर...
कुंडलीतील चतुर्थ स्थान आई व भूमीशी (जमीन) संबंधित आहे. सिंह लग्न कुंडलीत चतुर्थ स्थान वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाच्या या राशीत केतू असल्यास व्यक्तीला आईचे पूर्ण सुख मिळत नाही. त्याचबरोबर या लोकांसाठी घर, जमीन अशा कामामध्ये हानीचे योग जुळून येतात. या ग्रह स्थितीमुळे काही लोकांना जन्म स्थानापासून दूर राहण्याचे योग तयार होतात.