आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना केतुमुळे करावे लागतात अथक परिश्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भृगु संहितेनुसार जाणून घ्या, वृषभ लग्न कुंडलीतील नवम किंवा दशम स्थानामध्ये केतू असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा राहतो..

वृषभ लग्न कुंडलीतील नवम स्थानामध्ये केतू असेल तर...
कुंडलीतील नवम स्थान भाग्य स्थान मानले जाते. या लग्न कुंडलीत नवम स्थानात मकर राशीचा स्वामी शनि आहे. शनि आणि केतू मित्र ग्रह मानले जातात. याच कारणामुळे या स्थानात केतू असल्यास व्यक्तीला नशिबाची साथ मिळते. हे लोक धार्मिक स्वभावाचे असतात. या लोकांना जीवनात सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात.

वृषभ लग्न कुंडलीतील दशम स्थानामध्ये केतू असेल तर...
ज्या लोकांची वृषभ लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील दशम स्थानात केतू असल्यास व्यक्तीला वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळत नाही. कुंडलीतील दहावे स्थान वडील व शासकीय कामांशी संबंधित असते. या स्थानात कुंभ राशीचा स्वामी शनि असून शनीच्या या राशीत केतूच्या प्रभावाने व्यक्तीला कठीण परिश्रम केल्यानंतरच यश प्राप्त होते. या लोकांना खूप कष्ट करूनदेखील मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळण्यात विविध अडचणींचा सामना करावा लागतो. हे लोक परिश्रमी आणि धाडसी असतात.