आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळामुळे या लोकांना मिळत नाही पैशाचे पूर्ण सुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, कुंभ लग्न कुंडलीतील एकादश (अकराव्या) आणि द्वादश (बाराव्या) स्थानामध्ये मंगळ स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...

कुंभ लग्न कुंडलीतील एकादश स्थानामध्ये मंगळ असेल तर...
कुंडलीतील अकरावे स्थान लाभ कारक स्थान असते आणि कुंभ लग्न कुंडलीतील या स्थानामध्ये धनु राशीचा स्वामी गुरु आहे. गुरूच्या या राशीत मंगळ असल्यास व्यक्तीला आर्थिक कामांमध्ये भरपूर लाभ होतो. हे लोक व्यवसाय करत असतील तर त्यांना उत्तम लाभाची स्थिती निर्माण होते तसेच कुटुंबियांकडूनही सुख प्राप्त होते. मुलांकडूनही यांना सुख प्राप्त होते.

कुंभ लग्न कुंडलीतील द्वादश स्थानामध्ये मंगळ असेल तर...
कुंभ लग्न कुंडलीत या स्थानामध्ये मंगळ असल्यास व्यक्ती खर्चामुळे त्रस्त राहतो. कुंभ लग्न कुंडलीतील द्वादश स्थानामध्ये मकर राशीचा स्वामी शनि आहे. हे स्थान व्यय कारक स्थान असते. या स्थानामध्ये मंगळ असल्यास व्यक्ती जस्त पैसा कमावूनही असंतुष्ट राहतो, खर्च जास्त होतो. घर-कुटुंब आणि भावंडांच्या खर्चामुळे अडचणी निर्माण होतात. परंतु या लोकांना घरातील सदस्यांची पूर्ण मदत मिळते.