आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना जोडीदाराकडून मिळत नाही पूर्ण सहकार्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीची कुंडली मीन कुंभ लग्नाची असेल आणि कुंडलीतील सप्तम आणि अष्टम स्थानामध्ये शनि स्थित असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो.
मीन लग्न कुंडलीतील सप्तम स्थानामध्ये शनि असेल तर..
कुंडलीतील सप्तम स्थान जोडीदाराचे कारक स्थान असते आणि मीन लग्न कुंडलीतील या स्थानात कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या या राशीत शनि असल्यास व्यक्तीला जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळत नाही. यांचा खर्च जास्त प्रमाणात असतो. कुटुंबामध्ये याच कारणामुळे जास्त प्रमाणात मानसिक तणाव राहतो. आरोग्याच्या बाबतीतही या लोकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो.

मीन लग्न कुंडलीतील अष्टम स्थानामध्ये शनि असेल तर...
ज्या लोकांची मीन लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील अष्टम स्थानात शनि स्थित असेल तर या लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते. या लोकांना घरापासून दूर राहिल्यानंतर धनलाभ होतो. कुंडलीतील अष्टम स्थान आयु, स्वास्थ्य आणि पुरातत्व कारक स्थान असते. मीन लग्न कुंडलीतील या स्थानात शनि असल्यास व्यक्ती कष्टाळू होतो. हे लोक पैसा भरपूर कमावतात परंतु यांना धन संचय करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.