आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांचा जोडीदार बुद्धिमान आणि चतुर राहतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीची मकर लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील सप्तम व अष्टम स्थानात शुक्र स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...

मकर लग्न कुंडलीतील सप्तम स्थानात शुक्र असेल तर...
कुंडलीतील सप्तम स्थान जोडीदार आणि व्यवसाय कारक स्थान असते. मकर लग्न कुंडलीतील या स्थानात कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्राच्या राशीमध्ये शुक्र असल्यास व्यक्तीला सुंदर आणि गुणवान जोडीदार मिळतो. शुक्राच्या प्रभावाने यांचा जोडीदार बुद्धिमान आणि चतुर असतो. याच कारणामुळे यांना आर्थिक कामामध्ये विशेष लाभ होतो. यांना वडील आणि कुटुंबाचे पूर्ण सुख मिळते. सामान्यतः यांचे जीवन सुखी राहते.
मकर लग्न कुंडलीतील अष्टम स्थानात शुक्र असेल तर...
ज्या लोकांची मकर लग्न कुंडली असते आणि कुंडलीतील अष्टम स्थानामध्ये शुक्र स्थित असेल तर त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभते. हे लोक दीर्घायुषी असतात आणि निरोगी राहतात. कुंडलीतील अष्टम स्थान स्वास्थ्य, आयु कारक स्थान असते. मकर लग्न कुंडलीतील या स्थानामध्ये सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या स्थानात शुक्र असल्यामुळे व्यक्तीला मुलांकडून जास्त सुख मिळत नाही.