आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना मिळते मुलांचे पूर्ण सुख आणि सहकार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, एखाद्या व्यक्तीची मीन लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील पाचव्या, सहाव्या स्थानात सूर्य स्थित असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...
मीन लग्न कुंडलीतील पाचव्या स्थानात सूर्य असेल तर...
ज्या लोकांची मीन लग्न कुंडली आहे आणि कुंडलीतील पाचव्या स्थानामध्ये सूर्य स्थित असेल तर अशा लोकांना मुलांचे पूर्ण सुख आणि सहकार्य प्राप्त होते. यांना कुटुंबियांच्या मदतीने आर्थिक कामामध्ये यश मिळते. कधीकधी यांना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते परंतु धर्याने हे लोक त्या अडचणींवर मात करतात. शिक्षण क्षेत्रातही यांना खूप कष्ट करावे लागतात, तेव्हाच यश प्राप्त होते.

मीन लग्न कुंडलीतील सहाव्या स्थानात सूर्य असेल तर...
कुंडलीतील सहावे स्थान शत्रू व रोग कारक स्थान असते. मीन लग्न कुंडलीतील या स्थानामध्ये सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य आपल्या या राशीत स्थित असल्यास व्यक्तीला शक्ती आणि बुद्धी चातुर्य प्राप्त होते. हे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर कोणतेही काम सहजपणे पूर्ण करतात. यांच्या जीवनात खर्चाचे प्रमाण जास्त असल्यामुळे यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.