आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना भाऊ-बहिणीकडून मिळत नाही पूर्ण मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि कुंडलीत तृतीय आणि चतुर्थ स्थानात सूर्य स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर सूर्याचा प्रभाव कसा राहतो..

सिंह लग्न कुंडलीत तृतीय स्थानात सूर्य असेल तर..
सूर्य लग्न कुंडलीतील तृतीय स्थान तूळ राशीचे असून स्वामी शुक्र आहे. कुंडलीतील तुरीत्य स्थान भाऊ-बहिण आणि पराक्रमाशी संबंधित आहे. या स्थानामध्ये सूर्य असल्यामुळे व्यक्तीला भाऊ-बहिणीकडून पूर्ण सुख मिळत नाही. या व्यतिरिक्त यांच्या पराक्रमामध्ये कमतरता येते. या स्थानामध्ये सूर्य असल्यामुळे व्यक्ती आपल्या हिमतीच्या जोरावर कामामध्ये यश प्राप्त करतो. अन्यथा यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.
.
सिंह लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात सूर्य असेल तर..
ज्या लोकांची सिंह लग्न कुंडली आहे आणि कुंडलीतील चतुर्थ स्थानात सूर्य स्थित असेल तर, यांना आईचे पूर्ण सुख मिळते. सिंह लग्न कुंडलीत चतुर्थ स्थान वृश्चिक राशीचे असून स्वामी मंगळ आहे. मंगळ आणि सूर्याला एकमेकांचे मित्र मानले जाते. मंगळाच्या स्थानामध्ये सूर्य असल्यामुळे व्यक्तीला घर, जमानीशी संबंधित कामामध्ये लाभ होतो.