आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना बहिण-भावाकडून मिळत नाही पूर्ण प्रेम आणि मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि कुंडलीत तृतीय आणि चतुर्थ स्थानात सूर्य असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर सूर्याचा प्रभाव कसा राहतो..
सिंह लग्न कुंडलीत तृतीय स्थानात सूर्य असेल तर....
सिंह लग्न कुंडलीत तृतीय स्थान तूळ राशीचे असून स्वामी शुक्र आहे. कुंडलीतील तृतीय स्थान भाऊ-बहिण आणि पराक्रमाशी संबंधित आहे. या स्थानामध्ये सूर्य असल्यास व्यक्तीला बहिण-भावाचे पूर्ण सुख मिळत नाही. या व्यतिरिक्त यांच्या पराक्रमामध्ये कमतरता येते. या स्थानात सूर्य असल्यामुळे व्यक्ती स्वतःच्या कर्तुत्वावर यश प्राप्त करू शकतो, अन्यथा यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

सिंह लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात सूर्य असेल तर....
ज्या लोकांची कुंडली सिंह लग्नाची असेल आणि चतुर्थ स्थानात सूर्य स्थित असेल तर या लोकांना आईचे पूर्ण प्रेम मिळते. सिंह लग्न कुंडलीत चतुर्थ स्थान वृश्चिक राशीचे असून स्वामी मंगळ आहे. मंगळ आणि सूर्य मित्र ग्रह मानले जातात. मंगळ ग्रहाच्या स्थानामध्ये सूर्य असल्यामुळे व्यक्तीला घर आणि जमिनीतून लाभ प्राप्त होतो. या लोकांना जीवनात विविध क्षेत्रामध्ये यश प्राप्त होते.