आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Effects Of Sun Line In Palm 22 May 2014

PICS : या बोटाखाली असेल उभी रेषा तर तुम्हालाही मिळेल नेम+फेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळातील बहुतांश तरुण असे आहेत, ज्यांना खूप पैसा मिळवण्यासोबतच फेमस होण्याची इच्छा आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती कष्ट करून पैसा आणि नाव मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळते परंतु काही लोकांना खूप कष्ट करूनही मनासारखा पैसा आणि यश मिळत नाही.

हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार हातावर एक अशी रेषा असते, ज्यावरून व्यक्तीला जीवनात नेम आणि फेम मिळणार का नाही हे समजू शकते. हातावर दिसणार्‍या रेषा आपले भूत, भविष्य आणि वर्तमान सांगतात. हातावरील प्रत्येक रेषेचे वेगवेगळे महत्त्व आहे.

प्रत्येक रेषा वेगळ्या विषयासंबधी भविष्यवाणी करते. नाव आणि प्रसिद्धी मिळवून देणारी रेषा रिंग फिंगर (अनामिका )च्या खालील भागावर उभ्या स्थितीमध्ये असते.सामान्यतः ही रेषा प्रत्येक व्यक्तीच्या हातावर नसते. अनेक परिस्थितीमध्ये सूर्य रेषा हातावर असून देखील व्यक्तीला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.

पुढे जाणून घ्या, ही कोणती रेषा आहे तसेच हातावर कोठून सुरु होते आणि या रेषेचे कोणकोणते फळ प्राप्त होतात...