आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना मिळत नाही कष्टाचे पूर्ण फळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, जर एखाद्या व्यक्तीची वृश्चिक लग्न कुंडली असेल आणि त्याच्या एकादश आणि द्वादश स्थानामध्ये सूर्य स्थित असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...

वृश्चिक लग्न कुंडलीत एकादश स्थानामध्ये सूर्य असेल तर..
वृश्चिक लग्न कुंडलीतील अकराव्या स्थानामध्ये सूर्य स्थित असेल तर त्या व्यक्तीला भाग्याची पूर्ण मदत मिळते. शासकीय कामामध्ये यांना मान-सन्मान आणि लाभाची प्राप्ती होते. वृश्चिक लग्न कुंडलीतील एकादश स्थानामध्ये कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुधाच्या या राशीमध्ये सूर्य असल्यास व्यक्ती आई-वडिलांकडूनही धनलाभ प्राप्त करतो. हे लोक इतरांवर शासन करणारे, तेजस्वी आणि प्रतिष्टीत राहतात.

वृश्चिक लग्न कुंडलीतील द्वादश स्थानामध्ये सूर्य असेल तर...
कुंडलीतील बारावे स्थान व्यय कारक स्थान असते. या स्थानामध्ये सूर्य असल्यास व्यक्तीला दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. वृश्चिक राशीतील बाराव्या स्थानामध्ये तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. व्यय स्थानामध्ये सूर्य असल्यामुळे व्यक्तीला खूप कष्ट करूनदेखील मनासारखे फळ प्राप्त होत नाही.