आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रासारखे केलेकलेने वाढणारे अमरनाथ गुफेतील शिवलींग, जाणून घ्‍या काय आहे वास्‍तव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरातील शिवभक्‍तांसाठी शिवशंकराचे अनेक तिर्थस्‍थान आहेत, मात्र सर्वात महत्त्वाचे तिर्थस्‍थान म्‍हणून अमरनाथ गुहेतील शिवलिंगाला विशेष महत्त्व आहे. शिवशंकराच्‍या या तिर्थाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. श्रीनगरपासून अमरनाथ गुहा 145 किमी अंतरावर हिमालयाच्‍या पर्वतरांगामध्‍ये आहे. या गुहेची उंची 150 फुट आहे, तर रूंदी 90 फुट लांब आहे. येथेच शिवशंकराने पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितल्‍यामुळे या तिर्थाला विशेष महत्त्व प्राप्‍त झाले आहे.
हिमालयाच्‍या पर्वत रांगामध्‍ये 4000 मीटर उंचीवर शिवलींग आहे. चोहीकडे फक्‍त बर्फ पाहायला मिळतो. या गुहेत निर्माण होणारे शिवलिंग हे बर्फापासून तयार होते. हे शिवलिंग नैसर्गिक स्‍वरूपाचे असून ठरावीक काळात तयार होते. ज्‍या गुहेत बर्फापासून शिवलिंग तयार होते, त्‍या गुहेतील बर्फ मात्र कच्‍चा आहे. हा बर्फ हातात घेतले तरी विरघळतो. शिवलिंग ज्‍या बर्फापासून तयार होते तो बर्फ मात्र मजबुत असतो.
गुहेतील शिवलींगावर सतत बर्फाचे थेंब पडत असतात. यामुळे जवळपास दहा फुट उंचीचे शिवलिंग तयार होते. या शिवलिंगांची उंची चंद्राच्‍या आकाराबरोबर कमी जास्‍त होत राहाते, हे एक आश्चर्य. अमावास्‍याच्‍या दिवशी या शिवलिंगाचा आकार कमी झालेला असतो.

आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...