भारत जगातील पहिला असा देश ठरला आहे, जो पहिल्या प्रयत्नातच मंगळ ग्रहावर पोहचला. विज्ञान आणि शास्त्रामध्ये मंगळ ग्रहासंबंधी वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आज विज्ञानाच्या दृष्टीकोनातून सर्वठिकाणी मंगळ ग्रहाची चर्चा होत आहे. येथे शास्त्रानुसार जाणून घ्या, मंगळ ग्रहाशी संबंधित खास गोष्टी...
मंगळ ग्रहाचा परिचय
ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नऊ ग्रहांमध्ये एक ग्रह मंगळ आहे. या ग्रहाला सेनापतीचे पद प्राप्त आहे. मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ऊँ भौमाय नम: मंत्राचा जप केला जातो. मंगळदेवाचे शस्त्र त्रिशूळ, गदा आणि भाला हे आहेत. हा ग्रह मेष आणि वृषभ राशीचा स्वामी आहे.
मंगळ ग्रहामुळे मेष राशीच्या लोकांचा स्वभाव - ज्या लोकांच्या जन्म नावाचे पहिले अक्षर चू, चे, ला, ल, ली, लू, ले लो असते ते मेष राशीचे असतात. हे लोक राशीस्वामी मंगळामुळे आकर्षक आणि प्रभावशाली स्वभावाचे असतात. या कारणामुळे कुटुंब आणि समाजात यांना विशेष स्थान प्राप्त होते.
मंगळ ग्रहामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव - ज्या लोकांच्या जन्म नावाचे पहिले अक्षर तो, ला, नी, नू, ने, नो, या, यी, यू असते ते वृश्चिक राशीचे असतात. वृश्चिक राशीचे लोक जोडीदाराच्या प्रती समर्पणाचा भाव ठेवतात. या लोकांमध्ये अहंपणाची भावना असते. या कारणामुळे अनेकदा यांना वादाला सामोरे जावे लागू शकते.
पुढे जाणून घ्या, मंगळ ग्रहाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...