आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारळाचा एक ज्योतिषीय उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येथे नारळाशी संबंधित एक उपाय सांगण्यात येत आहे. या उपायाने विविध प्रकारचे शुभफळ प्राप्त होतील. देवी-देवतांची कृपा प्राप्त होते आणि कळत-नकळतपणे झालेल्या पापातून मुक्ती मिळते. जोतिष शास्त्रानुसार कुंडलीत ग्रहांची स्थिती ठीक नसेल तर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य ज्योतिषीय उपायाने ग्रह बाधा दूर केल्यास अशाप्रकारच्या अडचणींपासून बचाव होऊ शकतो. येथे सांगण्यात आलेला नारळाचा उपाय प्रत्येक शुक्रवारी करण्यात यावा.

उपायाचा विधी -
- प्रत्येक शुक्रवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून पवित्र झाल्यानंतर श्रीगणेश आणि धनाची देवी महालक्ष्मीची पूजा करावी
- शुक्रवारी महालक्ष्मीच्या पूजेमध्ये एक नारळ ठेवावे आणि पूजेनंतर तेच नारळ तिजोरीत ठेवावे.

- रात्रीच्या वेळी तिजोरीत ठेवलेले हे नारळ एखाद्या श्रीगणेशाच्या मंदिरात जाऊन अर्पण करा. श्रीगणेशाकडे सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करा.

- असे मानले जाते की, या उपायाचे काही दिवसांमध्येच सकारात्मक फळ प्राप्त होऊ लागतात.