ज्या लोकांच्या जन्म नावाचे पहिले अक्षर टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो पासून सुरु होते ते कन्या राशीचे असतात. या राशीचे बहुतांश लोक
आपल्या जोडीदाराच्या प्रती संवेदनशील असतात. यांचे बालपण संघर्षात जाते, यांना सुख-सुविधा सहजपणे प्राप्त होत नाहीत. हे लोक आपल्या योग्यतेच्या जोरावर उच्च पदापर्यंत पोहचतात. अडथळ्यांचा मार्ग यांना अडवू शकत नाही हे स्वतःच्या विचार, धैर्य, चातुर्य, संयमाने पुढे चालत राहतात.
कन्या राशीची ओळख
ज्योतिष शास्त्रानुसार कन्या रास स्त्री स्वभावाची रास आहे. राशी चक्रातील सहावी रास कन्या दक्षिण दिशेचे प्रतिक आहे. या राशीचे चिन्ह हातामध्ये फुल घेतलेली मुलगी असे आहे. राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या अंतर्गत उत्तराफाल्गुनी नक्षत्राचे दुसरे, तिसरे आणि चौथे चरण, चित्रा नक्षत्राचे पहिले दोन चरण आणि हस्त नक्षत्राचे चारही चरण येतात.
हे लोक असतात आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी
सामान्यतः कन्या राशीचे लोक लग्न आणि प्रेमा संबंधी पारंपारिक असतात. यांना सुख-सुविधायुक्त जीवन जास्त आवडते. या राशीचे लोक आकर्षक व्यक्तीचे धनी असतात. कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करण्यात हे माहीर असतात.
पुढे वाचा, कन्या राशीच्या लोकांच्या स्वभावाशी संबंधित इतर काही खास गोष्टी....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)