आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडली : या परिस्थितींमध्ये अशुभ ग्रहसुद्धा देतात राजयोगाचे सुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः सर्वाना हेच माहिती आहे की, कुंडलीतील नीच ग्रह किंवा अशुभ ग्रह नेहमी वाईट फळच प्रदान करतात. नेहमी दुःख, अडचणींना सामोरे जावे लागते, परंतु हे पूर्ण सत्य नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये काही अशा परीस्थिती सांगण्यात आल्या आहेत, जेव्हा एखादा नीच, अशुभ ग्रहसुद्धा व्यक्तीला राजयोग, सुख आणि समृद्धी प्रदान करतात. जर एखादा नीच ग्रह राजयोग तयार करत असेल तर त्याला नीच भंग राजयोग म्हणतात. येथे जाणून घ्या, या योगाशी संबंधित काही खास गोष्टी.

नीच भंग राजयोग कसा तयार करतो...
ज्योतिष शास्त्रानुसार नवमांश कुंडलीत ग्रह उच्च राशीत असेल आणि लग्न कुंडलीत नीच राशीत असेल तर तो ग्रह अशुभ फळ प्रदान करत नाही. या स्थितीमुळे नीच भंग राजयोग तयार होतो. या योगाच्या संदर्भात एखाद्या ज्योतिष विशेषज्ञाचा सल्ला घेणे योग्य राहते.

कुंडलीतील सर्व नऊ ग्रह वेगवेगळ्या राशींमध्ये निचेचे राहतात आणि वेगवेगळ्या राशींमध्ये उच्चेचे राहतात. जर एखादा ग्रह नीचेचा असेल तर अशुभ फळ प्रदान करतो, परंतु त्या राशीचा स्वामी जर उच्च राशीत स्थित असेल तर नीच ग्रहाचा दोष नष्ट होतो. यालाच नीच भंग योग म्हणतात.

पुढे जाणून घ्या, या योगाने कोणकोणते शुभफळ प्राप्त होतात...