आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Prediction About Planet Jupiter Changing Position On 19 June 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता गुरु आपल्या उच्च राशीत, जाणून घ्या जुलै 2015 पर्यंत 12 राशींवरील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (19 जून 2014) गुरुवारी गुरुने कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. गुरूच्या रास परिवर्तनासंबंधी वेगवेगळ्या पंचांगांमध्ये वेगवेगळ्या तिथी सांगण्यात आल्या आहेत. बहुतांश पंचांगानुसार गुरु ग्रहाने 19 जून रोजी मिथुन राशीमधून कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क रास चंद्राचे स्वामित्व असलेली रास आहे. या राशीमध्ये 5 डिग्रीवर आल्यानंतर गुरु उच्चेचा होईल. उर्वरित काळात मित्र राशीमध्ये मानला जाईल.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारा वर्षांनंतर गुरु पुन्हा उच्चेचा होणार आहे. एक राशीमध्ये हा ग्रह जवळपास 13 महिने राहतो आणि बारा वर्षांमध्ये एक राशीचे चक्र पूर्ण करतो. अशा प्रकारे जवळपास बारा वर्षांनंतर गुरु पुन्हा कर्क राशीत येत आहे.

स्वतंत्र भारताची रास कर्क आहे, गुरु या राशीत आल्याने देशासाठी हा काळ उत्तम राहील. जनतेला सरकारकडून मदत मिळेल. 2 नोव्हेंबर 2014 पर्यंत कर्क राशीवर शनीचा प्रभाव राहील, तरीही या राशीच्या लोकांना विशेष लाभ प्राप्त होईल. गुरूच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना एखादे मोठे पद तसेच नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पं. शर्मा यांच्यानुसार शनीची अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) मीन राशीवरसुद्धा आहे आणि या राशीपासून गुरु आता पाचवा होईल, जो मीन राशीला लाभ करून देणारा राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गुरूच्या रास परिवर्तनाचा प्रभाव कसा राहील आणि कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागेल...