आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 OCT : गुरुपुष्य मुहूर्तावर यामधील केवळ 1 उपायही वाढवू शकतो तुमचे उत्पन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक अमावस्येपुर्वी येणार्‍या पुष्य नक्षत्राला अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा हे नक्षत्र सोमवार, गुरुवार किंवा रविवारी येते, तेव्हा एक विशेष वार नक्षत्राचा योग निर्माण होतो. गुरुवारी हे नक्षत्र असल्यास गुरुपुष्य नावाचा योग जुळून येतो. गुरुपुष्य यावर्षी 16 ऑक्टोबरला आहे. ज्योतिष मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या खरेदीमुळे आर्थिक लाभ होतो. तुम्ही हे तर ऐकलेच असेल की, या दिवशी ऐश्वर्याशी संबंधित वस्तू खरेदी केल्याने फयदा होतो. परंतु तुम्ही या मुहूर्तावर काही विशेष वस्तू खरेदी करण्यास इच्छुक असाल ज्यामुळे तुमचे जीवन ऐश्वर्यसंपन्न होईल तर आम्ही तुम्हाला अशाच काही खास वस्तुंची माहिती देत आहोत ज्या खरेदी करून तिजोरीत किंवा धनस्थानावर ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकेल.

काय खरेदी करावे पुष्य नक्षत्रामध्ये
वाहन, मशीन, इलेक्ट्रॉनिक, घर-दुकान, प्लॉट, जमीन, सोन्या-चांदीचे दागिने, हिरे इ. वस्तू खरेदी करणे शुभ राहते. या व्यतिरिक्त आणखी काही ज्योतिषीय वस्तू आहेत, ज्या या योगामध्ये खरेदी करून घरात ठेवणे अत्यंत लाभदायक ठरू शकते.
करा हे उपाय -
मोती शंख - हा एक दुर्लभ प्रजातीचा शंख आहे. तंत्र शास्त्रानुसार हा शंख अत्यंत चमत्कारिक असतो. दिसायला खूपच सुंदर आणि चमक पांढर्या मोत्यासारखी असते.
- गुरुपुष्य योगामध्ये मोती शंख कारखान्यात स्थापित केल्यास आर्थिक उन्नती होते.
- मोती शंखामध्ये पाणी भरून लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा प्रतीमेजवळ ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.
- मोती शंखाची घरामध्ये स्थापना करून दररोज श्री महालक्ष्मै नम: मंत्राचा दररोज 11 वेळेस जप करून 1-1 तांदुळाचा दान यामध्ये टाकत राहा. 11 दिवस अशाप्रकारे जोप केल्यास आर्थिक अडचणी समाप्त होतील.
- जर व्यापारात नुकसान होत असेल किंवा दुकानातील उत्पन्न वाढत नसेल तर एक मोती शंख धनस्थानावर ठेवल्याने व्यापारात वृद्धी होईल.

पुढे वाचा आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)