आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीला जुळून येणारा दुर्लभ योग, जाणून घ्या राशीफळ आणि धनसमृद्ध करणारे उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, १७ फेब्रुवारी २०१४ रोजी होळी असून या वर्षी रंगाच्या या उत्सवामध्ये विविध दुर्लभ योग जुळून येत आहेत. होळी हा सण यावर्षी महादेव भक्तीच्या दिवशी म्हणजे सोमवारी आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास महादेवाची कृपा लवकर प्राप्त होईल.

होळीच्या दिवशी ज्योतिष योग
या वर्षी होळीला ग्रहांचे विविध दुर्लभ योग जुळून येतील. सध्या शनि वक्री असून राहू ग्रहासोबत तूळ राशीमध्ये स्थित आहे. या व्यतिरिक्त मंगळ ग्रहसुद्धा सध्या वक्री आहे. अशाप्रकारे या होळीला चार ग्रह शनि, मंगळ, आणि राहू-केतू वक्री राहतील. राहू आणि केतू हे ग्रह नेहमीच वक्री असतात.

तूळ राशीमध्ये मंगळ ग्रहासोबत शनि आणि राहूचा योग शेकडो वर्षांनंतर जुळून आला आहे. या कारणामुळे हा सण ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने विशेष झाला आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सध्या चार ग्रह वक्री असून यांचा सर्वाधिक प्रभाव तूळ आणि मेष राशीवर पडत आहे. मंगळ ग्रह शनि आणि राहुसोबत शत्रुभाव ठेवतो. २५ मार्चपर्यंत वक्री मंगळ, शनि आणि राहू एकत्र तूळ राशीत स्थित राहतील. येणाऱ्या काळात अशा प्रकारचा योग (वक्री मंगळ, शनि आणि राहू तूळ राशीत) तब्बल १७५ वर्षांनंतर जुळून येईल. असा योग शेकडो वर्षांपूर्वी सन् १६६० मध्ये जुळून आला होता.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, होळीचे राशिभविष्य आणि उपाय....