आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी 1 ऑगस्टला : केव्हाही साप दिसल्यानंतर समजून घ्या हे शकुन-अपशकून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील महिन्यातील एक तारखेला नागांची विशेष पूजा केली जाईल, कारण या दिवशी नागपंचमी आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. देशभरातील सर्व नाग आणि शिव मंदिरांमध्ये या दिवशी नागदेवाचे दर्शन घेतले जाते. प्रत्येक व्यक्ती सापाला पाहिल्यानंतर घाबरतो, परंतु शास्त्रामध्ये यांना पूजनीय मानण्यात आले आहे.

पावसाळ्यातील वातावरण ज्याप्रकारे आपल्याला आनंददायी वाटते, त्याचप्रकारे इतर पक्षी, प्राण्यांना हा ऋतू फार आवडतो. याच कारणामुळे इतर प्राण्यांप्रमाणे साप पावसाळ्यात इकडे-तिकडे फिरताना दिसतात. सामान्यतः बिळात लपून राहणारे सापही पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसतात. यामागचे कारण असे आहे की, पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी जाते यामुळे साप नवीन जागेच्या शोधासाठी बिळातून बाहेर निघतात.

ज्योतिष शास्त्रानुसार साप दिसण्यासंबंधित काही शकुन-अपशकून सांगण्यात आले आहेत. या संकेतांकडे लक्ष दिल्यास भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती समजू शकते. जे लोक ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी शकुन-अपशकूनच्या मान्यता खूप महत्त्वाच्या आहेत. अनेक लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात.

पुढे जाणून घ्या, सापांशी संबंधित शकुन-अपशकून...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)