आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना मुलांकडून पूर्ण सुख मिळत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, कुंभ लग्न कुंडलीच्या पाचव्या आणि सहाव्या स्थानामध्ये राहू असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...

कुंभ लग्न कुंडलीतील पाचव्या स्थानात राहू असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची कुंभ लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील पाचव्या स्थानात राहू स्थित असेल त्या व्यक्तीला मुलांकडून पूर्ण सुख मिळत नाही. अशा ग्रहस्थितीमुळे व्यक्ती स्वभावाने हुशार आणि मानसिक स्वरुपात सुदृढ असतो. कुंभ लग्न कुंडलीत पाचव्या स्थानात मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. हे स्थान शिक्षण आणि बुद्धी कारक स्थान आहे. या स्थानामध्ये राहू असल्यास व्यक्तीला मानसिक कामामध्ये यश मिळते.

कुंभ लग्न कुंडलीत सहाव्या स्थानात राहू असेल तर...
कुंडलीतील सहावे स्थान शत्रू आणि रोग कारक स्थान असते. कुंभ लग्न कुंडलीत सहाव्या स्थानात कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या स्थानात राहू असल्यास व्यक्तीला गुप्त योजनांच्या माध्यमातून लाभ होतो. या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता राहते.