आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीत शनि-चंद्र एकत्र असतील तर असा पडतो प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रावर अनेक लोकांचा विश्वास आहे. या शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र आणि शनी एकत्र शुभ स्थितीमध्ये एकाच स्थानात स्थित असतील तर व्यक्तीला जीवनात विविध सुख प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, चंद्र आणि शनि युतीचे कोणकोणते फळ प्राप्त होतात...

- ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र आणि शनि प्रथम स्थानात असतील, तो व्यक्ती नोकरी करणारा, लोभी, आळशी असू शकतो. हे लोक विश्वासपात्र नसतात.

- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र आणि शनि चतुर्थ स्थानामध्ये असतील तर व्यक्ती पाण्याशी संबंधित कार्य करणारा असतो. हे लोक खनिज पदार्थांचा व्यवसाय करतात.

- कुंडलीत चंद्र आणि शनि सातव्या स्थानात असतील तर व्यक्ती एखद्या मंत्र्याचा प्रिय असतो, परंतु अशा लोकांना स्त्रीपासून कष्ट प्राप्त होऊ शकतात.

- चंद्र आणि शनि कुंडलीतील दहाव्या स्थानात असतील तर तो व्यक्ती शत्रूंवर विजय प्राप्त करणारा असतो. सुविख्यात आणि राजासमान सुख प्राप्त करणारा असतो.

येथे फक्त शनि आणि चंद्राच्या युतीचे फळ सांगण्यात आले आहे. इतर ग्रहांच्या स्थितीनुसार शनि-चंद्राचे फळ बदलू शकतात. कुंडलीत इतर ग्रहस्थितीचा अभ्यास करूनच योग्य भविष्यवाणी केली जाऊ शकते.

पुढे जाणून घ्या, शान-चंद्र युतीचा वाईट प्रभाव कमी करणारे काही खास उपाय...