आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lunar Eclipse Astrological Prediction In Divya Mrathi

आज 74 वर्षांनंतर चंद्रग्रहणाला जुळून येणार दुर्लभ योग; वाचा खास गोष्टी आणि राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी 8 ऑक्टोबरला बुधवारी चंद्रग्रहणाचा योग जुळून येत आहे. हे ग्रहण मीन राशीमध्ये चंद्र व केतूच्या युतीमध्ये होईल. हा दुर्लभ योग 74 वर्षांनंतर जुळून येत आहे. चंद्रोदयापासून ग्रहण चालू होईल. हे ग्रहण भारतातील पूर्व आणि मध्य भागात जास्त काळ दिसेल. ज्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटापूर्वी चंद्रोदय होईल त्याच ठिकाणी हे ग्रहण दिसेल.

ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी 8 ऑक्टोबरला मीन राशीमध्ये खग्रास चंद्रग्रहण 74 वर्षांनी होत आहे. यापूर्वी हा योग 15 ऑक्टोबर 1940 साली जुळून आला होता. ग्रह गोचरमध्ये अशाप्रकारच्या स्थितीमध्ये विशेष बदल दिसून येतो. मीन राशीमध्ये खग्रास चंद्रग्रहण व सूर्य तसेच राहू कन्या राशीमध्ये ग्रहण युती तयार करत आहेत. या स्थितीनुसार मीन व कन्या राशीवर ग्रहणाचा विशेष प्रभाव राहील.

कोठे दिसणार ग्रहण -
भारतातील डिबुगढ येथे सर्वात जास्त काळाचे ( 1 तास 18 मिनिट) चंद्रग्रहण दिसेल तसेच शिलॉंगमध्ये हे ग्रहण 1 तास 5 मिनिटापर्यंत दिसेल. भारतातील इतर शहर, जबलपूर, नागपूर, दिल्ली, भोपाळ, चेन्नई, कोलकाता, गया, आग्रा, पटना, हरिद्वार, अलाहाबाद, बनारस, मथुरा, कानपूर, मेरठ, लखनऊ, पुरी, रायपुर, रांची या ठिकाणी थोडावेळ दिसेल. देशाचा पश्चिमी भाग गुजरात, राजस्थानमध्ये हे ग्रहण दिसणार नाही. भारताव्यतिरिक्त हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, अमेरिका, पॅसिफिक महासागर या ठिकाणी दिसेल.

ग्रहणाचा सूतक काळ
भारतीय वेळेनुसार ग्रहणाचा स्पर्श दुपारी 2 वाजून 44 मिनिटांनी होईल आणि मोक्ष 6 वाजून 4 मिनिटांनी होईल. ग्रहणाचा सुतक काळ सकाळी 4 वाजून 44 मिनिटांनी सुरु होईल.

चंद्रग्रहणाचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)