सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत जाण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. सूर्य पूर्ण वर्षात 12 राशींमध्ये भ्रमण करतो. प्रत्येक राशीत जवळपास महिनाभर राहतो. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. कधीकधी अधिक मास असल्यास संक्रांती काळ 24 ते 36 तासांचा होतो. असे घडल्यास मकरसंक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाते. या वर्षी सूर्य 14 तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता मकर राशीत प्रवेश करेल. सूर्याचा प्रभाव दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापासून सुरु होईल.
मागील महिन्यात 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत आला होता. आता 14 जानेवारीला संध्याकाळी रास बदलून मकर राशीत जाईल. मकर राशीतील सूर्य काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आणि काही राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील.
या राशींवर राहील सूर्याचा शुभ प्रभाव -
मेष, वृषभ, कर्क, सिंह, धनु आणि मकर
या राशींवर राहील सूर्याचा अशुभ प्रभाव -
मिथुन आणि वृश्चिक
या राशींवर राहील सामान्य प्रभाव
कन्या, तूळ, कुंभ आणि मीन
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, संपूर्ण राशिभविष्य आणि उपाय....