आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Weekly Horoscope Of Monday To Sunday 19 To 25 October

19-25 ऑक्टोबर : या आठवड्यात काय-काय घडू शकते तुमच्यासोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात चंद्र धनु राशीतून मीन राशीपर्यंत जाईल. हा आठवडा वस्त्र, धान्य आणि शेअर मार्केटशी संबंधित लोकांसाठी खास राहील. या व्यतिरिक्त नोकरी करणाऱ्या लोकांच्या पदोन्नती आणि बदलीसाठीसुद्धा हे सात दिवस खास राहतील.

या आठवड्यात कोणत्याही ग्रहाची चाल वक्री राहणार नाही. मागील काही दिवसांपासून बिझनेस कारक ग्रह बुध वक्री होता. यामुळे काही लोकांना बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागत होते आणि यशही प्राप्त होत नव्हते. आता हा ग्रह मार्गी झाल्यामुळे काही लोकांना प्रमोशन आणि फायदा करून देणारे योग जुळून येतील. नोकरी करणाऱ्या लोकांवर विशेष प्रभाव टाकणारा ग्रह सूर्य असतो. जो आपल्या नीच राशीत म्हणजे तूळ राशीमध्ये राहील. सूर्याच्या प्रभावाने लोकांचा स्थान परिवर्तनाचे योग जुळून येतील. या सात दिवसांमध्ये ग्रह स्थितीचा प्रभाव लोकांच्या मानसिक स्थितीवर पडेल. यामुळे काही लोकांच्या स्वभावात सकारात्मक बदल होतील.
मेष
कनिष्ठेतील सूर्याची व सुरुवातीला अष्टमेतील चंद्राची कृपादृष्टी राहील. उत्पन्नात अडचणी येतील. बुधवारपासून िस्थती पुन्हा चांगली होईल. सहकाऱ्याकडून सहकार्य मिळेल. तणाव जास्त राहील. गुरुवारी वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. शुक्र व शनिवार चांगले जातील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल.

नोकरी व व्यवसाय - कर्मचाऱ्यांकडून त्रास, ऐच्छिक कार्यात अपयश.
शिक्षण - शिक्षणातील निकाल अपेक्षेनुरूप लागणार नाही. तणाव राहील.
आरोग्य - मूत्रविकार, बद्धकोष्ठता व मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.
प्रेम - प्रेम प्रस्तावात अपयश येईल. वैवाहिक आयुष्यात माधुर्य राहील.

व्रत - दसऱ्याच्या मुहूर्तावर हनुमानाला फूल अर्पण करा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या आठवड्यात आणखी काय-काय घडू शकते तुमच्यासोबत...