Home »Jeevan Mantra »Jyotish» Marrige Good Sum Is End Today, Next Is After 73 Day

या कारणामुळे 'व्हॅलेंटाइन डे'ला लग्न मुहूर्त नाही

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 11, 2013, 12:48 PM IST

  • या कारणामुळे 'व्हॅलेंटाइन डे'ला लग्न मुहूर्त नाही

प्रेमाला नात्यात जोडण्यासाठी व्हॅलेंटाइन डेला लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा प्रेमी जोडप्यांचा विचार असतो, परंतु ज्या लोकांना १४ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर लग्न करण्याची इच्छा आहे, त्यांना थोडी वाट पाहण्याची गरज आहे. ७ फेब्रुवारीला लग्नाचा शेवटचा मुहूर्त आहे. त्यानंतर ७३ दिवसांनी लग्नाचे मुहूर्त सुरु होतील. अशी परिस्थिती शुक्र आस्तामुळे निर्माण झाली आहे.

ज्योतिषाचार्य पं श्यामनारायण व्यास यांच्यानुसार १५ फेब्रुवारी पासून २२ एप्रिलपर्यंत (७३ दिवस) शुक्रअस्त राहील. बालत्व दोषामुळे २३ ते २८ एप्रिलपर्यंत मुहूर्त नाहीत. २९ एप्रिलपासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होईल. शुक्रअस्तच्या संदर्भात ज्योतिषाचा-यांमध्ये मतमतांतर आहेत. पं. आनंदशंकर व्यास यांनी १० फेब्रुवारीला शुक्रअस्त होईल तर जबलपूरच्या लाला रामस्वरूप रामनारायण पंचांगामध्ये १३ फेब्रुवारीला शुक्रअस्त सांगितला आहे.

गुरु-शुक्र अस्तामध्ये या कारणांमुळे लग्न होत नाहीत...
ज्योतिषाचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरु व शुक्र दोन्ही शुभ ग्रह आहेत, हे ग्रह सूर्याच्या प्रभावामुळे अस्त होतात असे मानले जाते. यामुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त निघत नाहीत. यांचा उदय झाल्यानंतर शुभ कार्य सुरु होतात.

Next Article

Recommended