Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction

मंगळ मिथुन राशीमध्ये : या 6 राशींसाठी अशुभ काळ, तुमच्यासाठी कसा राहील

जीवनमंत्र डेस्क | Update - May 31, 2017, 01:08 PM IST

27 मेपासून 13 जुलैपर्यंत मंगळ मिथुन राशीमध्ये राहील. यामुळे मिथुन, कर्क, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे.

 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction

  27 मेपासून 13 जुलैपर्यंत मंगळ मिथुन राशीमध्ये राहील. यामुळे मिथुन, कर्क, वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे. या सहा राशीच्या लोकांना धनहानी आणि वाद होण्याचे योग जुळून येत आहेत. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठीसुद्धा काळ ठीक नाही. या व्यतिरिक्त मेष, सिंह, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. प्रॉपर्टी आणि पैशांच्या बाबतीत या चार राशीचे लोक लकी राहतील. वृषभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, तुमच्या राशीचे संपूर्ण राशीफळ...

 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  मेष - गोचर कुंडलीतील तिसऱ्या स्थानात मंगळ असल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ चांगला राहील. नोकरी किंवा बिझनेसमध्ये एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी इम्प्रेस होतील. या काळात नशिबाची साथ मिळाल्यामुळे प्रमोशन मिळण्याचे योग जुळून येऊ शकतात. नवीन लोकांच्या ओळखी होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. जूनमधील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत खास राहील.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  वृषभ - या राशीच्या लोकांसाठी मिथुन राशीतील मंगळ संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा होईल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल परंतु सावधानी बाळगून करावे. बिझनेसमध्ये रिस्क घेण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. या काळात इनकम आणि सेव्हिंग वाढू शकते, परंतु खर्च वाढण्याचीसुद्धा शक्यता आहे. आर्थिक कामासाठी हा काळ ठीक नाही. जोडीदाराच्या आरोग्यामुळे चिंताग्रस्त राहाल. कुटुंबातील वृद्ध मंडळींच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  मिथुन - तुमच्या राशीमध्ये मंगळ असल्यामुळे क्रोध आणि उत्साह वाढू शकतो. थोडासा अहंकार आणि गर्वही वाढल्यामुळे अडचणीत येऊ शकता. यामुळे काही मनाविरुद्ध बदल घडू शकतात. या काळात नवीन घर, प्रॉपर्टीशी संबंधित कामामध्ये वाद होण्याचे योग आहेत परंतु यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. लाईफ पार्टनरमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. या काळात एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होईल. मैत्री किंवा प्रोफेशनल रिलेशन सुरु होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांनी या काळात सावध राहावे.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  कर्क - मिथुन राशीतील मंगळ तुमच्यासाठी ठीक नाही. या दिवसांमध्ये गोचर कुंडलीतील बाराव्या स्थानात मंगळ असल्यामुळे   खर्च वाढू शकतो. पैशांचे नुकसान होऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात पैसा अडकू शकतो. पूर्ण विचार करून गुंतवणूक करावी. कोणालाही सल्ला देऊ नये, जर तुम्ही एखाद्या प्रकारचे सल्लागार असाल तर या काळात हनुमानाच्या पायावर शेंदुर कपाळाला  लावून कामाची सुरुवात करावी. मंगळामुळे तुम्हाला या काळात जास्त कष्ट करावे लागतील. आर्थिक व्यवहार, हिशोब, गुंतवणूक कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  सिंह - या काळात एखाद्या मंगलकार्य होईल. उत्पन्न वाढेल तसेच सेव्हिंगही वाढवण्यासाठी तुम्ही या काळात एखाद्या नवीन प्रोजक्टमध्ये पैसा लावू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. कामाच्या पद्धतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मित्र किंवा बहीण-भावाची कामामध्ये मदत मिळेल. या काळात एखादी चांगली बातमी समसल्यामुळे तुमची टेन्शन दूर होईल. लव्ह-लाईफच्या बाबतीत हा काळ चढ-उताराचा राहील. जोडीदार तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. बिझनेसमध्ये फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  कन्या - गोचर कुंडलीतील दहाव्या स्थानात मंगळ असल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ चांगला राहील. नोकरदार लोकांच्या कामावर वरिष्ठ खुश होतील. या काळात केलेले काम तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पुढे जाण्याची एखादी सुवर्णसंधी मिळू शकते. एखादा नवीन बिझनेस, काम किंवा नोकरी सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. वर्क प्लेसवर अपोझिट जेंडरकडे आकर्षित होऊ शकतात परंतु तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकणार नाहीत. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होईल. एकमेकांमधील प्रेम वाढेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. यासोबतच वडिलांच्या तब्येतीमुळे चिंताग्रस्त राहाल.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  तूळ - मिथुन राशीमध्ये मंगळ असल्यामुळे तुम्ही विविध कामामध्ये लकी राहू शकता. जास्त धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. या काळात जुन्या कामाचे फळ मिळेल. एक्स्ट्रॉ इनकम वाढू शकते. दूरच प्रवास करावा लागू शकतो. पूजा-पाठ किंवा एखाद्या मंगल कार्यावर पैसा खर्च होऊ शकतो. तूळ राशीच्या लोकांनी बिझनेस पार्टनरच्या बाबतीत सावध राहावे. तुमच्या उत्पन्नाचा जास्त हिस्सा पार्टनरला मिळू शकतो. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. ट्रान्स्फर होण्याचे योग आहेत.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  वृश्चिक - तुमच्यासाठी मंगळ ग्रहाची स्थिती ठीक नाही. नोकरी करणाऱ्या लोकांनाही कोणत्याही कामामध्ये रिस्क घेऊ नये. मोठे आणि जबाबदारीचे काम सावधपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बिझनेसमध्ये मोठे निर्णय घेण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. कामाच्या बाबतीत कन्फ्युजन वाढू शकते. एखाद्या प्रकराची भीती किंवा शंका मनात राहील. प्रॉपर्टी किंवा कोणत्याही प्रकारच्या संपत्तीमध्ये या काळात पैसा लावू नये. सोबत काम करणाऱ्या किंवा जवळपासच्या लोकांवर चिडचिड होऊ शकते. यामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  धनु - मिथुन राशीतील मंगळ दैनंदिन कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतो. रुटीन लाईफमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये पार्टनरसोबत वाद होऊ शकतात. या काळात मूड आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. पती-पत्नीमधील तणाव वाढू शकतो. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ ठीक नाही. एखादे कोर्ट प्रकरण चालू असल्यास त्यामध्ये पैसा आणि वेळ वाया जाऊ शकतो. जुने शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. नोकरदार लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, जी पूर्ण करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल परंतु त्यामुळे तुम्ही संतुष्ट होणार नाहीत.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  मकर - मिथुन राशीतील मंगळ तुमच्या आरोग्यासाठी ठीक नाही. जुन्या आजारांमुळे त्रास वाढू शकतो. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा. या काळात तुमची इच्छा नसतानाही तुम्ही एखाद्या वादामध्ये अडकू शकता. जुने शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. कुंडलीतील सहाव्या स्थानात मंगळ असल्यामुळे अजुळतील कुटुंबाकडून एखादी अशुभ बातमी समजू शकते. या काळात कोणालाही उसने पैसे देऊ नये. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. लव्ह लाईफ आणि मॅरीड लाईफसाठी हा काळ चांगला राहू शकतो.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  कुंभ - मंगळ ग्रहांमुळे नोकरदार लोकांचे कामामध्ये मन लागणार नाही. नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न करू नये. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यातच तुमची भलाई आहे. बिझनेस करणारे लोक जास्त पैसा कमावण्याच्या नादात चुकीचे पाऊल उचलू शकतात. शॉर्टकटने पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही प्रकराची नवीन गुंतवणूक करू नये. या काळात आरोग्याचीसुद्धा विशेष काळजी घ्यावी. डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात जास्त मेहनत करावी लागेल.
 • Mars Transit In Gemini marathi 12 Zodiac Horoscope marathi Astrology Prediction
  मीन - या राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना कामाशी संबंधित मोठे टेन्शन निर्माण होऊ शकते. राहते ठिकाण बदलण्याचे योग जुळून येत आहेत. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण न झाल्यामुळे मूड खराब होऊ शकतो. व्यर्थ खर्च वाढेल. या काळात कुटुंबातील काही वाद संपुष्टात येऊ शकतात. या राशीच्या लोकांना घरापासून दूर जावे लागू शकते. गोचर कुंडलीतील चौथ्या स्थानातील मंगळ तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये लाभ मिळवून देऊ शकतो. नवीन गाडी खरेदी करण्याचे योग आहेत.

Trending