आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जूनचे राशिभविष्य : 12 राशींसाठी कसे राहतील हे 30 दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्यात सूर्य आणि मंगळ रास बदलतील, बुध मार्गी होईल. बुध सध्या तिरक्या चालीने चालत असून 12 जून रोजी मार्गी होईल. या तीन ग्रहांच्या बदलांचा शुभ-अशुभ प्रभाव 12 राशींवर पडेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य वृषभ राशीत राहील. सूर्यावर शनीची पूर्ण दृष्टी पडत आहे. सूर्य शनीमुळे पिडीत असल्यामुळे महिन्यातील सुरुवातीचे दिवस काही लोकांसाठी ठीक नसतील. महिन्याच्या मध्यात सूर्य रास बदलून मिथुन राशीत जाईल. मिथुन राशीत सूर्य आल्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील.

नोकरदार वर्गाच्या अडचणी समाप्त होतील. या महिन्यात मंगळ ग्रहसुद्धा रास बदलत आहे. मंगला कर्जाचा कारक ग्रह आहे. मंगळ ग्रहाने रास बदलल्यामुळे लोन संबंधित कामे पूर्ण होतील. काही लोकांना या महिन्यात कर्ज घ्यावे लागू शकते आणि काही लोक कर्जमुक्त होऊ शकतात. या तीस दिवसांमध्ये इतर ग्रहांच्या स्थितीनुसार काही लोकांना अचानक धनलाभ होतील तर काही लोकांचा खर्च वाढू शकतो. जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील हा महिना.