आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमध्ये 9 ग्रहांच्या स्थितीचा कसा राहील तुमच्या राशीवरील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल-2015 ची सुरुवात मघा नक्षत्रासोबत होत आहे. 1 तारखेला बुधवार आणि मघा नक्षत्राच्या योगाने चार योग जुळून येत आहेत. हे योग शुभफळ देणारे आहेत. एप्रिल महिन्यात नऊ ग्रहांची स्थिती अशाप्रकारे राहील...

1. सूर्य मीन राशीत आणि 14 एप्रिलपासून मेष राशीत राहील.
2. चंद्र 1 एप्रिलला सिंह राशीत, 2 एप्रिलला कन्या राशीमध्ये आणि त्यानंतर प्रत्येक अडीच दिवसाला चंद्र रास बदलेल.
3. मंगळ संपूर्ण महिना मेष राशीत राहील.
4. बुध मीन राशीमध्ये आणि 12 एप्रिलपासून मेष राशीत. त्यानंतर 27 तारखेपासून वृषभ राशीत.
5. गुरु कर्क राशीमध्ये वक्री आणि 9 एप्रिलपासून मार्गी होईल.
6. शुक्र मेष राशीमध्ये आणि 6 एप्रिलपासून वृषभ राशीत.
7. शनि वृश्चिक राशीमध्ये वक्री राहील.
8. राहु कन्या राशीमध्ये राहील.
9. केतू मीन राशीमध्ये राहील.

मेष
खोळंबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवे मित्र मिळतील. प्रसिद्ध लोकांशी संपर्क वाढेल. खूप मेहनतीने कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. तसेच भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षाकडून लाभ मिळण्याची शक्यता. कामात यश मिळेल व अपेक्षेनुरूप लाभ पदरी पडेल.

आरोग्य - या वर्षी आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. शनीच्या दशेमुळे वारंवार नव्या समस्या उद्भवतील. जखमही होऊ शकते.
कुटुंब - कुटुंबाचे पूर्णपणे सहकार्य मिळेल. केवळ नातेवाइकांकडून अधिक अपेक्षा न केल्यासच बरे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल व सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल.
करिअर - शनीची दशा असल्यामुळे वारंवार कामाचे स्वरूप बदलावे वाटेल. परंतु असा निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी वाद वाढतील.
व्यवसाय - या वर्षी गुंतवणूक इत्यादींबाबतीत पूर्ण खबरदारी बाळगा. कुणाला न सांगता व्यवहार करू नका. व्यापारवृद्धीचा विचार असल्यास थोडी वाट पाहावी लागेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर राशींच्या लोकांसाठी कसा राहील हा महिना...