आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबर अखेरीस मोदी जाणार अमेरिकेला, आताच जाणून घ्या कसा राहील दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिना अखेरीस अमेरिका दौर्‍यावर जात आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकासरकारने नरेंद्र मोदींना अमेरिकेत येण्यासाठी व्हिसा नाकारला होता, परंतु आता त्याच देशात मोदी सन्मानाने जात आहेत. यामुळे मोदींच्या अमेरिका दौर्‍यावर देश-विदेशाच्या नजरा खिळल्या आहेत. शक्तिशाली देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये होणारी चर्चा दोन्ही देशांसोबतच संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण राहील. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार येणार्‍या काळात या दौर्‍याचा प्रभाव भारतासाठी कसा राहील...

भारत आणि नरेंद्र मोदींना होणार फायदा...
वर्तमानात गुरु ग्रह भारताच्या कर्क राशीमध्ये स्थित आहे. या राशीमध्ये गुरु उच्चेचा असून अमेरिकेची रास मकर आहे. मकर राशीवर गुरु ग्रहाची पूर्ण सप्तम दृष्टी राहील. या ग्रह स्थितीमुळे दोन्ही देशांना नजीकच्या काळात लाभ प्राप्त होईल. सध्या हे दोन्ही देश आर्थिक मंदीतून उभारी घेण्यात अग्रेसर आहेत. या दौर्‍यामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. भारतासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा दौरा खूप खास आणि ऐतिहासिक राहील. मोदींना अमेरिकेत भरपूर मान-सन्मान आणि यश प्राप्त होईल.

पुढे वाचा, या दौर्‍यासंबंधित इतर काही खास गोष्टी....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)